Thursday, October 27, 2011

भगवानभाईंनी आतापर्यंत भारतातील विविध प्रांतातील 5000 शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन लाखो विद्यार्थ्यांना मूल्यनिष्ठ शिक्षणाद्वारे नैतिक व अध्यात्मिक विकासासाठी उद्‌बोधन केले आहे. 800 कारागृहांमध्ये जाऊन हजारो कैद्यांना गुन्हेगारी सोडून आप

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे मुख्यालय असलेल्या माऊंट अबू येथील ब्रह्माकुमार भगवानभाईंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेवून त्यांच्या कार्याची "इंडिया बुक ऑफ रेकार्ड' मध्ये नुकतीच नोंद झाली असून दिल्ली येथे एका विशेष समारंभामध्ये इंडिया बुक ऑफ रेकार्डचे मुख्य संपादक विश्वरूपराय चौधरी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
भगवानभाईंनी आतापर्यंत भारतातील विविध प्रांतातील 5000 शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन लाखो विद्यार्थ्यांना मूल्यनिष्ठ शिक्षणाद्वारे नैतिक व अध्यात्मिक विकासासाठी उद्‌बोधन केले आहे. 800 कारागृहांमध्ये जाऊन हजारो कैद्यांना गुन्हेगारी सोडून आपल्या जीवनामध्ये सद्‌भावना, मूल्य तसेच मानवतेला स्थापित करण्यासाठी प्रेरित केले आहे. या कार्याची नोंद घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सत्कारानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ब्र. कु.भगवानभाई म्हणाले, समाजामधील भ्रष्टाचार, व्यसनाधिनता, गुन्हेगारी समाप्त करावयाची असेल तर त्यासाठी शिक्षणामध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे. शाळा/ महाविद्यालयांमधूनच समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्ती प्रवेश करते. आजचा विद्यार्थीच उद्याचा समाज आहे. म्हणूनच समाजाच्या विकासासाठी शिक्षणामध्ये मूल्य व अध्यात्मिकतेचा समावेश करण्याची आवश्यकता आहे.
सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातील तळेवाडी या छोट्याशा खेड्यात एका निरक्षर व गरीब कुटुंबात जन्मलेल्या भगवानभाईंना लिहिण्या- वाचण्यासाठी वही, पुस्तकेसुध्दा मिळत नव्हती. वयाच्या 11 वर्षी त्यांनी शाळेत जायला सुरूवात केली. ते जुन्या रद्दीमधील वह्यांची कोरी पाने व शाईने लिहिलेली पाने पाण्याने धुवून, सुकवून त्या पानांचा उपयोग लिहिण्यासाठी करीत. अशाच रद्दीमध्ये त्यांना ब्रह्माकुमारी संस्थेच्या एका पुस्तकाची काही पाने मिळाली. या रद्दीतील पानानींच त्यांचे जीवन बदलून गेले. त्या पानावर असलेल्या पत्त्यावरून ते ब्रह्माकुमारीसंस्थेमध्ये पोहचले व तेथील ईश्वरीय ज्ञान व राजयोगाचा अभ्यास करून आपले मनोबल वाढविले व त्या फलस्वरूप माऊंट अबू येथील आपले सेवाकार्य सांभाळून आजपर्यंत त्यांनी 5000 शाळा, महाविद्यालये व 800 कारागृहात जाऊन या सेवेचे एक रेकॉर्ड प्रस्थापित केले.
वर्तमानसमयी ब्रह्माकुमार भगवानभाई ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या शांतीवन या मुख्यालयातील विशाल किचनमध्ये सेवारत असून अनेक मासिकातून तसेच वृत्तपत्रातून आतापर्यंत 2000 हून अधिक लेख लिहिले आहेत. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल सातारा सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी रूक्मिणी बहेनजी व शिक्षणाधिकारी (माध्य.) मकरंद गोंधळी यांनी त्यांचे अभिनंदन केले
परमात्मा किसी से भेद नहीं करता। जिसने सबका सृजन किया है वह किसी से भेद करेगा भी क्यूं? माया के भ्ावरजाल में फंसकर उससे दूरी तो हमने ही बना रखी है। उससे नाता जोड़ना चाहते हो तो प्रेमपूर्वक आकर मिलो। लग जाओ साधना में नि:स्वार्थ भाव से वह तुम्हारे स्वागत को आतुर है।
उक्त विचार रेलवे स्टेडियम प्रांगण में चल रहे गीता सार प्रवचन में प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विवि की ख्याति लब्ध विद्वान ब्र.कु. उषा बहन ने व्यक्त किये। रविवार को प्रसंग को आगे बढ़ाते हुये उन्होंने कहा कि गीता में श्रीकृष्ण अर्जुन को परमात्मा से मिलन का रहस्य समझाते हैं। भगवान कहते हैं कि जो मेरी अनन्य भाव से सेवा करता है वह मेरा मित्र तथा मैं उसका मित्र हूं। गृहस्थ जीवन में रहकर भी भक्ति साधना करते रहने के बारे में उन्हों ने कहा कि कुछ भी कार्य-व्यवहार करते समय भगवान को नहीं भूलना चाहिए। भक्ति जानना चाहते हो तो विष्णु भगवान के शंख, सुदर्शन चक्र, गदा और कमल से सीख लो। शंख का स्वभाव ओम् ध्वनि का उच्चारण करना है। सुदर्शन का भाव हर एक के अंदर शुभ का दर्शन करना, गदा का ज्ञान का प्रतीक है तथा कमल से सीख मिलती है कि कीचड़ में रहकर भी पवित्रता के शीर्ष पर रहो।
इससे पूर्व महापौर श्रीमती अंजू चौधरी ने उषा बहन को स्मृति चिह्न भेंटकर सम्मान दिया और प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा किये जा रहे सेवाकार्यो की सराहना की।
इंसर्ट- बीमारी के बावजूद नही टूटा प्रवचन करने हौसला
गोरखपुर। ब्र.कु. उषा बहन जबसे गोरखपुर आयी हैं उनका समय बेहद व्यस्त रहा है। प्रतिदिन सुबह 6.30 से 8 बजे तथा शाम को भी इसी वक्त कथा और ध्यान में उनका समय गुजर रहा है। इसके अलावा दिन के समय शहर में किसी न किसी आध्यात्मिक कार्यक्रमों आदि में उनका आना जाना रहता है। रविवार को सुबह कथा के बाद सिविल लाइन्स स्थित गोकुल अतिथि भवन में उनका कार्यक्रम था। थकान की वजह से उनकी तबियत खराब हो गयी बावजूद इसके उन्होंने शाम का प्रवचन नही छोड़ा।

No comments:

Post a Comment